बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. अशातच आता या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टात जावून दाद मागणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानसभेबाहेर माध्यमांशी बोलताना पाटलांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, आमच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना शिवी दिली नाही. याउलट अध्यक्षांनीच शिवी दिली आणि कारवाई मात्र आमच्या आमदारांवर करण्यात आली. या निलंबनाच्या कारवाईविरोधात आम्ही कोर्टात जावून दाद मागणार आहोत.

तसेच खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडीच्या सरकारकडूनच शिकलं पाहिजे, असा घणाघात देखील पाटलांनी यावेळी केला आहे.  राज्य सरकारने 23 हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेतल्याचं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं- देवेंद्र फडणवीस

आलिया आणि रणवीरचा ‘हा’ चित्रपट होतोय रिलीज, करणने पुन्हा बनवली प्रेम कहाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More