“ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं, महाराष्ट्राचा इतिहास आहे, जे मंत्री आरोपी झाले ते…”
सांगली | गेल्या काही महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसेच वित्तहानी झाली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मागील काही महिन्यात अनेक ठिकाणी महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं 10 हजार कोटींची पॅकेज फसवं आहे. मुळात 2019 च्या जीआरनुसार शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आम्ही करत होतो. 2019 मध्ये आम्ही शेतकऱ्यांना सरसकट शेतीची नुकसान भरपाई दिली होती. परंतु हे सरकार सध्या पंचनाम्याचं तुणतुणं वाजवत आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
जितेंद्र आव्हाड सध्या आरोपी झाले आहेत. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास आहे की, जे मंत्री आरोपी झाले आहेत ते मंत्रिपदाचा राजीनामा देतात. परंतु महाविकास आघाडीतील अनिल परब, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांचा समज झाला आहे की, सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय झाला आहे. त्यामुळे हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
थोडक्यात बातम्या-
ना रोहित, ना विराट बॉलिवूडचा भाईजान ‘या’ दोन खेळाडूंचा झालाय जबरा फॅन!
“मराठी-अमराठी गाडून हिंदूत्वाची भक्कम एकजूट बांधा”
“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”
“माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का?”
“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”
Comments are closed.