बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…

पुणे |  राज्यसभेच्या (Rajyasabha)निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजपमध्ये(BJP) आंनदाचं वातावरण पसरलं आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हपुरचे दोन मल्ल मैदानात उतरले होते. त्यामुळे हा सामना चुरसीचा होता. यात धनंजय महाडिक विजयी झाले.

हा विजयी भाजपने कोथरूड मंडलच्या वतीने कार्यक्रम करत कार्यकर्त्यांशी संवाद साधून साजरा केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील(chandrakantdada patil) उपस्थित होते. खासदार गिरिश बापट यांच्याहस्ते चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

धनंजय महाडिक यांना संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मत मिळाल्याने संजय राऊतांनाही चितपट व्हावं लागलं, असा टोमणाही त्यांनी मारला. तसेच महापालिकेची निवडणूक अजून बाकी असून त्यातही आम्हीच विजयी होऊ असंही ते म्हणाले.

दरम्यान, 20 तारखेला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”

‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस

“आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी; तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”

“अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही; एका राज्यसभेने पुन्हा मुख्यमंत्री बनता येत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More