बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! संरक्षण सचिव, गृहसचिव आणि आयबी प्रमुखांच्या कार्यकाळातही बदल

नवी दिल्ली | इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट अर्थात ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणातील संचालकांचा कार्यकाळ बदलाच्या केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ईडी आणि सीबीआयमधील संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांवरून पाच वर्षे करण्याचा वटहुकुम केंद्र सरकारने रविवारी काढला.

सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणातील संचालकांच्या कार्यकाळात बदल केल्यानंतर आता संरक्षण सचिव, केंद्रीय गृहसचिव आणि इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी प्रमुखांच्या कार्यकाळातही बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. संरक्षण आणि केंद्रीय गृहसचिव तसेच आयबी प्रमुखांच्या कार्यकाळात बदल केला असल्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार संरक्षण सचिव, केंद्रीय गृहसचिव आणि आयबी प्रमुखांचा कार्यकाळही आता दोन वर्षांचा असणार आहे. सरकारने सीबीआय, ईडीमधील संचालकांच्या कार्यकाळात बदल केल्यानंतर प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेची चेष्टा लावली असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.

संसदीय लोकशाहीतील संस्थांचे महत्व संपवूण टाकण्याचे या सरकारने ठरवले असल्याची गंभीर टीका राजद नेते मनोज झा यांनी केली आहे. दरम्यान, संसदेचे अधिवेशनही याच महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे, हे वटहुकुम काढण्याचे कारण काय आहे?, असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांकडून विचारण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या, कधीही होऊ शकते अटक

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More