Top News राजकारण

चंगू मंगूच्या फालतू गप्पा, फुकट्या लोकांना बघायला इंटरेस्ट नाही; मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर निलेश राणेंची टीका

मुंबई | सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीये.

निलेश राणेंनी याबाबत ट्विट केलंय. “ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा.” अशा शब्दांत त्यांनी टीका केलीये.

दरम्यान संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो ट्विटरवरून शेअर केलाय. यामध्ये “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

‘क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा’; प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या