Top News

“भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत… दोन्ही पक्षांनी एकत्र यावं”

मुंबई | भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत. 30 वर्षांपासून आमची मैत्री आहे. आमचं रक्त, हिंदुत्व समान आहे. जनादेश दोघांना मिळाला होता. दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं. याबाबत आम्ही आशावादी आहोत, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

काल (मंगळवार) रात्री शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना भाजप कधीही एकत्र येतील, अशी आशा व्यक्त केली त्यानंतर भाजप-सेनेच्या ज्या नेत्यांना युती व्हावी वाटते त्यांच्या आशा बळावल्या आहेत. चंद्रकांत पाटलांनी युतीबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.

भाजप-सेनेने पुन्हा एकत्र यावं. सत्तास्थापन करावी. एकत्र सरकार चालवावं.  मात्र हा आशावाद केवळ झाला. पण तसं होणार आहे की नाही हे मला माहीत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मनोहर जोशींपाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना-भाजपने एकत्र यावं, असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येतील का? हा प्रश्न चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या