बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

मुंबई | राज्यात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर आता भाजपने(BJP) लगेच त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा केली. यापूर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. परंतु आता पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळताच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार, अशा चर्चा होत्या. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.

भाजपने नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार(Ashish Shelar) यांच्याकडे देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्याकडे आधीही ही जबाबदारी होती. मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, ही जबाबदारी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत होती. त्यापैकी आशिष शेलार आणि राम शिंदे यांची नावे चर्चित होती, पण आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली. विदर्भाचा आणि ओबीसी चेहारा म्हणून त्यांची या पदी वर्णी लागली, असंही म्हटलं जात आहे. बावनकुळेंना यापूर्वी विधानसभेचं तिकिट नाकारलं होतं. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेत आमदारकी आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने सर्वत्र त्यांच्या नावाच्या चर्चा होत आहेत.

दरम्यान, काॅंग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) हे देखील विदर्भाचे आहेत. तसेच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष हेही विदर्भाचे झालेत. तुलनेने शिवसेवा आणि राष्ट्रवादीचे विदर्भात फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे  विदर्भात आता भाजप विरूद्ध काॅंग्रेस असा राजकीय खेळ पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बाबा नेहमी म्हणायचे राजकारण करायचं तर…’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

‘आता डबल इंजिनचं सरकार आहे, त्यामुळे…’; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

‘बंड करताना शहीद होण्याचा धोका होता’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

“राज्य सरकार केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचंय”

‘…असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’; राहुल गांधी मोदींवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More