बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्याच्या घराला कधी छत नव्हतं, त्याला आज काॅंग्रेसने मुख्यमंत्री बनवलंय”

नवी दिल्ली | पंजाबमध्ये अनेक राजकीय घडामोडीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी अखेर आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे चन्नी हे पंजाबमधील पहिलेच कथित दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचबरोबर काॅंग्रेस नेते सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनाही पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्यात काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी उपस्थित होते.

शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. त्यातून अखेर पंजाब काॅंग्रसेने चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. चन्नी यांच्यानंतर फक्त दोनच नेत्यांना शपथ देण्यात आली आहे. बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार काही कालावधीनंतर करण्यात येणार आहे. चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्याचे आभार मानले आहे.

हायकमांडने एका सामान्य माणसाच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धूरा सोपवली आहे. ज्याच्या घराला कधी काळी छत नव्हतं. आज काॅंग्रेसने त्याला मुख्यमंत्री बनवलं आहे, अशा भावना चन्नी यांंनी व्यक्त केल्या. कृषी कायदे मागे घेतलं नाही तर कृषीव्यवस्थाच नष्ट होईल. याचा परिणाम पंजाबमधील सगळ्याच शेतकऱ्यांना होणार आहे. पंरतु पंजाबच्या शेतकऱ्यांना आम्ही कमजोर होऊ देणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे, असे आवाहन देखील चन्नी यांनी मोदी सरकारला केलं आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काॅंग्रेसने दलित नेत्यांची निवड केल्यामुळे पंजाबमध्ये जातीचं समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शपथ सोहळ्याला काॅंग्रसे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेत्री कंगाना रनौतवर अटकेची टांगती तलवार, आज होणार सुनावणी

मुश्रीफ म्हणाले, ‘दादांकडून भाजप प्रवेशाची ऑफर’, आता चंद्रकांत पाटील म्हणतात….

“शरद पवारांचं नाव घेण्याची त्यांची लायकी आहे का?”

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More