बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘संभाजी भिडे’ यांच्यावर गुन्हा दाखल

सातारा | राज्य सरकारच्या पायीवारीच्या निर्बंधांना न जुमानता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील कोरोनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांच्यासह आणखी 80 धारकऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केले गेले आहेत. कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना काळात बंदी असताना देखील बेकायदा जमाव जमवून रॅली काढली, त्याचबरोबर मंदिरात प्रवेश बंदी असतानाही मंदिर उघडून प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यासह 80 जणांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देलं. त्यावेळी त्यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या 70 ते 80 धारकऱ्यांनी बंद असलेले साईबाबा मंदीर उघडून आत बसले होते. त्यांच्या या कृत्यामुळे शासकिय नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्रशासनाने सांगितलं. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

खासदार नारायण राणेंना दिल्लीतून तातडीने बोलावणं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान?

मोहन भागवत यांच्यावर असदुद्दीन ओवैसींचा पलटवार, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

बापरे! गेल्या दोन महिन्यात तब्बल 35 वेळा वाढले पेट्रोलचे दर

“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह भाजपचे सगळे आमदार माझ्या एकट्यावर तुटून पडले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More