मुंबई | कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी पंतप्रधान मोदींनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सगळेच जण सध्या घरात आहेत. कलाविश्वातली मंडळी देखील सध्या आपापल्या घरात बसून आपल्या जोडीदाराला वेळ देत आहेत. मात्र चारु आसोपा सेन आणि राजीव सेन हे सेलिब्रिटी कपल सद्या क्वारन्टाईन पिरियडमध्ये बेडरुमधले फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर टीकेचे धनी झाले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी अनेकदा उघडपणे प्रेम व्यक्त करण्यावरुन त्यांच्यावर याआधी बऱ्याच वेळा टीकेची झोड उठली आहे. यावेळी क्वारन्टाईन टाईम म्हणत आसोपा सेन आणि राजीव सेन यांनी खूपच प्रायव्हेट फोटो शेअर केल्याने चाहत्यांनी मात्र त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वी राजीवने एक फोटो पोस्ट केला होता. या सेल्फी फोटोंमध्ये हे दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. आम्ही क्वारंटनाइनच्या या दिवसांच्या प्रेमात आहोत. तुम्हीही आहात का?, असं कॅप्शन देत राजीवने हा फोटो शेअर केला होता. क्वारंटाइनमध्ये आम्ही आनंदात आहोत. घरी राहा. सुरक्षित राहा, असं या फोटोवर कमेंट करताना चारुने म्हटलं होतं.
दरम्यान,तुम्ही पती-पत्नी असलात तरी सोशल नेटवर्किंगवर काय पोस्ट करावं याचं भान हवं, तुमच्या घरचेही हे फोटो बघत असतील, हे अती खासगी क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याची गरज नव्हती अशा अनेक कमेंट या दोघांच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
क्वारंनटाईन सांगितलं तर तिथेही गप्प नाही… नमाज पठण सुरूच
घराबाहेर पडणारे दवाखान्यात अन् नियम मोडणारे यापुढे तुरूंगात दिसतील- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
“साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या रुग्णालयाची गरज कुणालाच लागू नये”
“अल्लाहने आजार दिला असेल तर कुठलाही डाॅक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही”
रॅपिड टेस्टिंगची मान्यता मिळालीये, आता 5 मिनिटांत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळणार- आरोग्यमंत्री
Comments are closed.