समाजकंटकांवर कारवाई करा; संभाजीराजेंची राज्यसभेत मागणी

नव्वी दिल्ली | भीमा कोरेगाव प्रकरणी राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले .यावेळी खासदार  छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यसभेत निवेदन दिले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांततेचं आवाहन केलंय.

मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, कारण मी त्या राजघराण्यातील आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज,  डाॅ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या भूमीत जो प्रकार घडला तो निंदनीय आहे, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले

तसेच जे कोणी समाजकंटक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी राज्यसभेत केली.