Top News महाराष्ट्र सातारा

“शिवछत्रपतींचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन जनतेची सेवा करतोय…”

सातारा |  भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना इतर स्लोगन न वापरण्याची समज दिली. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलकं ट्विट केलं आहे.

शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, आदर्श व त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो. यापुढे फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करून राज्यसभेची संधी लोकहितासाठी वापरणार. जय भवानी, जय शिवराय!, असं ट्विट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा काल दिल्लीत पार पडला. कोरोनामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांच्यासहित उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली.

शपथ घेताना उदयनराजेंनी दिलेल्या घोषणेमुळे व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत शपथ घेतली. शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजपचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी, केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराज हवेत”

अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा- संदीप देशपांडे

राजगृह तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी केली दुसरी मोठी कारवाई

कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच कोकिलाबेन रूग्णालयात ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया

खासगी लॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह तर सरकारी अहवाल निगेटिव्ह; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या