भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!

Pune News l स्वातंत्रदिनानिमित्त अनेकांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक नागरिक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशातच पुणेकर देखील शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी उत्सुक असतात. मात्र आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील श्री चतु:शृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी तब्बल 1 महिना बंद असणार आहे.

एक महिना चतु:शृंगी देवीचे मंदिर बंद असणार :

ऐन श्रावण महिन्यात पुण्यातील श्री चतु:शृंगी देवीचे मंदिर बंद असणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी येत्या 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये चतु:शृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.त्यामुळे आता पुणेकरांनी देखील देवस्थान कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नवरात्रोत्सवात चतु:श्रुंगी देवीच्या मंदिरात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. अशातच अगदी काही दिवसांवर नवरात्री हा सण आला आहे. या निमित्तानं मंदिराचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळेच चतु:श्रुंगी देवीच्या मंदिराच्या जेर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शन बंद असणार आहे अशी माहिती मंदिर कमिटीने दिली आहे.

Pune News l जीर्णोद्धाराच्या कामासाठी भाविकांनी सहकार्य करावे :

श्री चतु:श्रुंगी देवीचे मंदिर हे जीर्णोद्धाराच्या कामासाठी 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दर्शनासाठी बंद राहणार आहे. या कालावधीत देवीची मूर्ती पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी देखील या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे.

पुणे शहरात असलेल्या चतुश्रृंगी देवीला महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आणि अंबरेश्वरी सहयोगी श्री देवी चतुश्रृंगी म्हणून देखील ओळखले जाते. तिचे मंदिर पुण्याच्या वायव्य दिशेला डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. तसेच हे मंदिर निसर्गाच्या नयनरम्य सौंदर्याच्या मध्यभागी आहे. या 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद मंदिराची देखभाल श्री देवी चतुश्रृंगी मंदिर ट्रस्ट करत आहे.

News Title : Chaturshringi Devi Mandir

महत्वाच्या बातम्या-

या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!

मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण

नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज

आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज