Home Loan l प्रत्येक नागरिकाचं स्वतःच का होईना एक घर असावं असं स्वप्न असतं. मात्र वाढत्या महागाईमुळे ते खरेदी करणं शक्य होत नाही. जर तुम्हालाही स्वत:च्या हक्काचं घर घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या अनेक बँकांकडून एफडीवर आकर्षक व्याजदराची ऑफर सुरु आहे. मात्र आता आपण जाणून घेऊयात कोणत्या बँकेमध्ये काय ऑफर आहे.
बँक ऑफ बडोदा :
आजकाल बँक ऑफ बडोदामध्ये अनेक नागरिक खाते उघडत आहेत. कारण आता बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना तब्बल 8.40 टक्के व्याज दरानं होम लोन दिलं जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते होम लोन झिरो प्रोसेसिंग फी सोबत मिळत आहे.
याशिवाय कार लोन देखील 8.95 टक्के व्याज दरानं मिळत आहे. तसेच पर्सनल लोन हे 10.80 टक्के व्याज दरानं बँकांकडून दिल जात आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदा या बँकेकडून फिक्स डिपॉजिटवर 7.30 टक्के व्याजदर मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना देखील 7.80 इतकं व्याज देण्यात येत आहे.
Home Loan l बँक ऑफ महाराष्ट्र :
बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेकडून होम लोन 8.35 टक्के व्याज दरानं दिल जात आहे. तसेच ते होम लोन हे देखील कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारता उपलब्ध मिळत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कार लोन देखील 8.70 टक्के व्याज दराने देत आहे.
याशिवाय सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने होम लोन कमी दरामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच SBI कार लोनवर देखील कोणतेही प्रोसेसिंग फी घेत नाही. याशिवाय एफडीवर देखील आकर्षक व्याज दर दिला जात आहे.
News Title – Cheapest home loan & car loan rate
महत्त्वाच्या बातम्या-
निवडणुकीच्या तोंडावर आमदार गायब झाल्याने राज्यात खळबळ!
मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात
माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवारांकडून बडा उमेदवार मैदानात
लक्ष्मी पावली! धनत्रयोदशीला सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे भाव
“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा