मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
परमबीर सिंह यांनी या प्रकरणात आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी एक याचिका दाखल करून मी केलेल्या आरोपात तथ्य असून मी कोणतेही खोटे आरोप केलेले नाही असं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे कळेल सचिन वाझे गृहमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी किती वेळा भेटायला आले. असंही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेलं पत्र लिहिल्यानंतर परमबीर सिंह यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची दाट शक्यता असल्याने लवकरात लवकर तपास पूर्ण होणेही आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
याबरोबरच, 24 व 25 ऑगस्ट 2020 ला रश्मी शुक्ला ज्या गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना एक अहवाल दिला होता. ज्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख हे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचाही उल्लेख सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला तर, राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
“चौकशी पूर्ण होईपर्यंत अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या”
मराठवाड्यातील ‘हा’ जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांनी दिले आदेश
बसा बोंबलत! ‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला किम जोंगने दिली ‘ही’ शिक्षा
अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.