बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘CCTV तपासा, एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’; पार्टीमधील ‘या’ व्यक्तीचा खळबळजनक आरोप

मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या मित्रासह आठ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अशातच अरबाज मर्चंटने जामिनासाठी अर्ज केला असून त्याने एनसीबीवर खळबळजनक आरोप केला आहे.

अरबाज मर्चंटने जामिनासाठी अर्ज दाखल करत असताना एनसीबीनेच ड्रग्ज ठेवले असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचे सीसीटीव्ही फुटेज देखील देण्याची मागणी यावेळी अरबाजने केली आहे.

2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी अरबाज मर्चंटने केली आहे. तसेच, सीआयएसएफने त्याची एक कॉपी ठेवावी, असं देखील त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायालयाने आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंटला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने त्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पर्यावरणासाठी एक पाऊल! ‘वन्यजीव सप्ताह’ अंधारबन जंगलमध्ये साजरा

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More