बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ

पुणे | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. यामध्ये सध्या चर्चेत असलेले नाव किरण गोसावी याला सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीचा एक व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधून किरणने त्याचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईलवर खळबळजनक आरोप केले आहेत.

मुंबई पोलिसांनी प्रभाकर साईलचे प्रकरण हातात घेतले आहे तर त्यांनी सर्वात आधी प्रभाकरवर कारवाई करावी, तसेच त्याचे आणि त्याच्या भावाचे फोन रेकॉर्ड तपासावेत, असं किरण गोसावीने म्हटलं आहे. या फोन रेकॉर्डमधून मंत्री वगैरे जेवढे याच्यामागे आहे. त्या सर्वांची माहीती काढावी, असं आवाहन देखील किरण गोसावीने केलं आहे.

प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर किरण गोसावी गेले काही दिवस फरार होता. यानंतर किरणने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी त्यास नकार दिला होता. यानंतर पुणे पोलिस त्याच्या शोधात निघाले. अशातच आज सकाळी पुणे पोलिसांनी किरणला अटक केली आहे.

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अडचणीत आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी किरण गोसावीने 18 कोटी रुपयांची डील केल्याचा आरोप त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला होता.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

“एका ट्विटवरून गुन्हा दाखल करणारे सन्माननीय मुख्यमंत्री आता गप्प का?”

“कोणतेही दाखले काढायचे असल्यास काढून मिळतील- नवाब मलिक झेराॅक्स सेंटर”

उधारीवर एअर इंडियाचा विमान प्रवास बंद, रोख भरा आणि तिकीटं घ्या

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More