बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तक्रार करणाऱ्यांचा आणि माझा इतिहास तपासा, गेली 25 वर्ष मी संसदेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय” – अरविंद सावंत

नवी दिल्ली | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिल्यानंतर त्याचे पडसाद संसदेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोपही केला.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत धमकावल्याची लेखी तक्रार थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक भूमिका घेऊन टीका केल्याबद्दल अरविंद सावंत यांनी ‘तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि तुलाही अटक करू’, अशा भाषेत नवनीत राणांना धमकावलं असल्याची तक्रार त्यांनी केली.

नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उत्तर दिलं आहे. आयुष्यातील 50 वर्ष मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आणि त्यातील 25 वर्ष मी संसदेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्यामुळे संसदेची मर्यादा आणि भाषेची मर्यादा मला आहे. असं सावंतांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच तक्रार करणाऱ्यांचा इतिहास तपासा आणि माझाही इतिहास तपासा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संसदेच्या मर्यादेचं पालन मी आतापर्यंत करत आलो आहे. त्यामुळे मी स्वतः या प्रकरणात चौकशीची मागणी करतो. असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत बोलून दाखवलं. त्याबरोबरच देशभरात नवनीत राणा यांच्या तक्रारींचं पत्र पसरल्यामुळे माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. विशेषतः एका महिलेचा मी अपमान केल्याची तक्रार असल्याने माझी नाहक बदनामी होत आहे, त्यामुळे या प्रकरणात सीसीटीव्ही तपासा, मी अनेक वेळा नवनीत राणा यांच्याशी बोलतो, त्या मला दादा म्हणून हाक मारतात. पण कुठेही धमकी वगैरे देण्याचा प्रश्न येत नाही. असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या – 

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

रश्मी शुक्लांनी भाजपमध्ये राहण्यासाठी ‘या’ आमदारावर आणला दबाव; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

विमाधारकांसाठी आनंदाची बातमी; अटी पूर्ण होत नसतील तर ‘या’ कालावधीत करू शकता पॉलिसी रद्द

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More