बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरूचा विजय रथ रोखला, चेन्नईचा 69 धावांनी विजय

मुंबई | रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामन्यात चेन्नईने बंगळुरूवर 69 धावा आणि 13 चेंडू राखून विजय मिळवला आहे. अष्टपैलू जडेजाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चेन्नईने यंदाच्या मोसमात अपराजित असलेल्या बंगळुरूचा पराभव केला आहे. चेन्नईने हा सामना जिंकत गुणतालिकेत सरशी साधत पहिला नंबर मिळवला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची जबरदस्त सुरूवात झाली. सलामीवीर फाफ आणि गायकवाड यांनी धमाकेदार सुरूवात करून दिली. मात्र गायकवाड बाद झाला त्यानंतर आलेल्या रैनानेही आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने 3 षटकार आणि चौकार मारत 24 धावा केल्या. पटेलने त्याला बाद केलं त्यानंतर फाफलाही पटेलने बाद करत चेन्नईला बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात चेन्नई अपयशी ठरते की काय असं वाटत असताना जडेजाने जोरदार फलंदाजी केली.

शून्यावर फलंदाजी करत असताना जीवदान लाभलेल्या जडेजाने बंगळुरूचा घाम काढला. जडेजाने 28 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाच्या वादळी खेळीमुळे चेन्नईने बंगळुरुसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.चेन्नईने 4 गडी गमवून 191 धावा केल्या.

दरम्यान, जडेजाने गोलंदाजीतही कमाल करत आपल्या 4 षटकांमध्ये त्याने फक्त 13 धावा देत 3 गडी बाद केले. त्यासोबतच 1 षटक निर्धावही टाकलं. त्यासोबतच ताहीर ने 2 आणि सॅम करन आणि ठाकूरने 1 गडी बादर करत बंगळुरूला 122 धावात रोखलं.

थोडक्यात बातम्या- 

ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही; आई बापानं उचललं अभिमानास्पद पाऊल

…म्हणून पोलीस स्टेशनमध्येच नवरीला लागली हळद, कारण ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

एका रेमडेसिवीरची किंमत ऐकून हैराण व्हाल, पुणे गुन्हे शाखेकडून चौघांना अटक

कंगणाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नेटकऱ्यांचा पारा चढला

रॉकस्टार जडेजा! जडेजाने एका षटकात काढल्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More