मुंबई | चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहणार आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात ब्राव्होच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो 2 आठवड्यांसाठी संघाबाहेर गेला आहे.
ब्राव्होचं संघात नसणं हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे, असं सहाय्यक प्रशिक्षक मायकल हसी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामने जिंकण्यात ब्राव्होने अनेकदा मोलाचे योगदान दिलं आहे. त्याच्या संघाबाहेर जाण्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन ‘राहुल गांधी’
-बोलताना जरा मर्यादा राखा… सुषमा स्वराजांनी टोचले राहुल गांधींचे कान!
-‘न्याय’ योजनेसाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून वसूल करु- राहुल गांधी
–संजय राऊतांकडून छगन भुजबळांचा आसाराम बापु म्हणून उल्लेख!
-यूपीएससीत पहिला क्रमांक पटकावला; आई-वडिलांसोबत प्रेयसीलाही दिलं श्रेय
Comments are closed.