बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुसऱ्या सत्रात चेन्नईची धमाकेदार सुरूवात; मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव

मुंबई | आयपीएल 14 सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणकालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे.

प्रथम नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईची टाॅप ऑर्डर मोडीस काढली. मात्र एक बाजू संभाळून खेळत असलेल्या ऋतुराज गायकवाडने तुफानी फलंदाजी करत चेन्नईचा डाव सावरला. तर अखेर ड्वेन ब्रावोने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर चेन्नईने मुंबईला 157 धावांचं आव्हान दिलं होतं

157 धावांचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी देखील ढेपाळली. मुंबईचे सलामीवीर काही खास कामगिरी करू शकले नाहीत. तर ईशान किशन आणि कर्णधार कायरन पोलार्ड देखील काही खास कामगिरी करू शकले नाहीत. तर चेन्नईकडून दिपक चहरने 2 तर ड्वेन ब्रावोने 3 गडी बाद केले आहेत. त्यामुळे मुंबईला केवळ 136 धावा करता आल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात ऋतुराज गायकवाड यांची फलंदाजी खास राहिली. त्याने अखेरपर्यंत चेन्नईची खिंड लढवली. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी देखील भेदक गोलंदाजी केली होती.

थोडक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना; राजकीय बॉम्ब फोडण्याची शक्यता

नितीन गडकरींनी बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाला तडे, पंकजा मुंडे म्हणतात…

“सोमय्यांना दिल्लीत मुजरा करायला देत नाहीत म्हणून गल्लीत गोंधळ घालतात”

…तर राज्य सरकारविरूद्ध आमचा संघर्ष सुरुच राहील – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More