पुणे | पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सुखद धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पुण्यासाठी वेगवेगळे तर्क लढवले जात असताना चेतन तुपेंना संधी देण्यात आलीय.
दरम्यान, पुणे राष्ट्रवादीची जबाबदारी याआधी खासदार वंदना चव्हाण यांच्यावर होती. त्यामुळे पुणे शहरात नसलेली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता चेतन तुपेंच्या खांद्यावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.#NCP #DistrictPresidents pic.twitter.com/DmMmmxlYOp
— NCP (@NCPspeaks) August 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!
-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय
-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित
-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर ‘हे’ परिणाम होतील
-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त
Comments are closed.