Top News खेळ

‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ

मुंबई | इग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने कसोटीवर आपली मजबूत पकड केली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 555 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला आहे. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. त्यातच भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारादुर्दैवीरित्या बाद झाला.

भारतीय संघाची 4 बाद 73 धावा अशी अवस्था असताना पुजारा आणि पंतने डाव सांभाळला. यामध्ये दोघांनी आपली अर्धशतके पुर्ण केलीत. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करत असलेला पुजारा वैयक्तिक 73 धावांवर असताना डॉमनिक बेसचा चेंडू पुजाराने टोलावला मात्र चेंडू फॉरवर्ड लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडीच्या पाठीवर बसला आणि  मिड-विकेटचा क्षेत्ररक्षक रॉरी बर्न्सच्या हातात झेल गेला.

पुजाराने चांगला शॉट मारूनही त्याला आपली विकेट गमवावी लागली. पुजाराला नशिबाने साथ दिली असती तर पुजारा कदाचित शतक करू शकला असताआ आणि भारतीय संघाची धावसंख्या चांगली असती.

दरम्यान, पुजाराही चेंडूकडे पाहत होता जेव्हा झेल पकडला गेला तेव्हा तो खूप निराश झालेला दिसला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशलम माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोद

“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या