Chhaava box office | विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘छावा’ (Chhaava box office ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट सतत विक्रमी कमाई करत असून, आता तो 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
20 व्या दिवशी ‘छावा’ची कमाई किती?
‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्यगाथेवर आधारित ऐतिहासिक चित्रपट असून, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी त्याचे चित्रण केले आहे. चित्रपटाच्या कथेने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
‘छावा’ने 20 व्या दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 477.65 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘छावा’चे आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
- पहिला आठवडा: ₹219.25 कोटी
- दुसरा आठवडा: ₹180.25 कोटी
- 15 वा दिवस: ₹13 कोटी
- 16 वा दिवस: ₹22 कोटी
- 17 वा दिवस: ₹24.25 कोटी
- 18 वा दिवस: ₹7.75 कोटी
- 19 वा दिवस: ₹5.4 कोटी
- 20 वा दिवस: ₹5.75 कोटी
- एकूण कमाई: ₹477.65 कोटी
20 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘छावा’चा समावेश
‘छावा’ने आपल्या 20 व्या दिवशी ‘स्त्री 2’, ‘अॅनिमल’, ‘जवान’, ‘पठाण’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. (Chhaava box office )
- छावा: ₹5.75 कोटी
- स्त्री 2: ₹5.5 कोटी
- अॅनिमल: ₹4.7 कोटी
- जवान: ₹4.4 कोटी
- पठाण: ₹4.1 कोटी
- पद्मावत: ₹3.75 कोटी
Title : Chhaava box office Set to Enter 500 Crore Club