Chhaava | विक्की कौशलचा (Vicky Kaushal) बहुचर्चित चित्रपट ‘छावा’ (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. 24 दिवसांत 531.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवून ‘छावा’ने ‘गदर 2’ (525.7 कोटी) चा विक्रम मोडला आहे. आता या चित्रपटाचं पुढचं लक्ष्य शाहरुख खानच्या ‘पठाण’ (543.09 कोटी) आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ (553.87 कोटी) कडे आहे.
‘छावा’ची चौथ्या आठवड्यात दमदार कमाई
निर्मात्यांच्या आकडेवारीनुसार,
पहिला आठवडा – 225.8 कोटी
दुसरा आठवडा – 186.18 कोटी
तिसरा आठवडा – 84.94 कोटी
22 वा दिवस – 6.30 कोटी
23 वा दिवस – 13.70 कोटी
24 वा दिवस (सकाळी 10:30 पर्यंत) – 9.2 कोटी
छावाची एकूण कमाई 531.54 कोटी रुपये झाली असून, ‘पठाण’च्या विक्रमापासून चित्रपट फक्त 12 कोटींच्या अंतरावर आहे.
‘छावा’ तेलुगू प्रेक्षकांमध्येही सुपरहिट
चित्रपटाचे तेलुगू भाषेतील प्रदर्शन झाल्यानंतर त्याच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर थिएटरमध्ये गर्दी करत आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात हा चित्रपट आणखी विक्रम करू शकतो.
जर ‘छावा’ची (Chhaava) कमाई अशीच सुरू राहिली, तर तो भारतीय सिनेमाच्या इतिहासातील टॉप ब्लॉकबस्टर्समध्ये समाविष्ट होईल.
Title : Chhaava Breaks Gadar 2 Record Targets Pathaan Next