बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यंत्रणांच्या धाडीमुळे महाराष्ट्र कधीच मागे हटणार नाही, तो अशा गोष्टींसमोर झुकत नाही”

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणा महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींवर कारवाया करत आहेत. या व्यक्ती राजकारणाशी निगडीत असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रातील संस्थांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते केंद्र सरकारवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी देखील या मुद्यावरुन केंद्र सरकारला टार्गेट केलं आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्र्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर केंद्रातील यंत्रणा धाडी टाकत आहेत. परंतु या धाडींचा भाजपला फायदा होणार नसून त्याचा फटका बसणार आहे. हा महाराष्ट्र आहे यंत्रणांच्या धाडींमुळे केव्हाच मागे हटणार नाही. महाराष्ट्र अशा गोष्टींसमोर झुकत नाही, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना सुणावलं आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यासाठी चालू असाणारे हे प्रयत्न चुकीचे आहेत. भाजपने याचा विचार करावा. असं करुन त्यांच्या लोकप्रियतेवरच त्याचा परिणाम होईल. आता मध्यमवर्गीयांवर देखील आयटीच्या धाडी पडतात, असा टोला देखील छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकार ओबीसीच्या पाठीशी आहे. ओबीसीसाठी मी जिवावर खेळून पक्षांतर केलं होतं. आता काही लोक कोर्टात जात आहेत, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

अन् कुत्र्यानेही धरला ठेका, कुत्र्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील

पुण्यातील उपायुक्तांचं भांडं फुटलं, घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं!

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More