मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!

मुंबई | मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पवारसाहेबच अंतिम निर्णय घेतील, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते. 

नाशिकमधील सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की छगन भुजबळ उमेदवार म्हणुन हवेत. मात्र एक महिन्यापुर्वीच एका कार्यक्रमात मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही सांगितलं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं. 

कोणी कुठे उभं राहावं याबद्द्ल शरद पवार विचारपुर्वक ठरवतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल, असं त्यांनी सांगितलं, 

दरम्यान, शिवसेनेविषयी बोलताना ‘बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते’, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!

-#MeToo | आमिर खानचा मोठा निर्णय; त्या व्यक्तींसोबत काम करणार नाही!

-एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवलेत की ते वेडे झालेत- दिवाकर रावते

-“खुद्द शरद पवार मोदींविरोधात बोलत नाहीत, कार्यकर्त्यांनी का न्यूनगंड बाळगायचा?”

-#MeToo | एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीवर विनयभंगाचा आरोप