नाशिक महाराष्ट्र

राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलीकडची- छगन भुजबळ

नाशिक | सरकारनं महसूलाच्या इतर मार्गांबरोबरच मद्य विक्री सुरू करावी, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सूचनेला समर्थनं दिलं आहे.

राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडची आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आह. एका मुलाखतीत छगन भुजबळ यांनी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे.

कोरोनाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. राज्य सरकारला खर्च करावा लागतं आहे. उलट तो वाढला आहे. तर उत्पन्नाचे रस्ते मात्र बंद झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची सूचना वास्तविक आणि राजकारणापलिकडं जाऊन केलेली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला. आता सरकारनं नागरी भागातील दुकानं उघडण्यास शर्थींसह परवानगी दिली आहे. ही दुकानं उघडावीच लागणार आहेत. कोरोना कधीपर्यंत थांबेल हे कुणालाही सांगता येत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या