अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | मनुस्मृतीचा आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा अशी चर्चा केली जात आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनुस्मृतीला विरोध केला आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर छगन भुजबळ संतापले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची आहे. मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू दिली जाणार नसल्याचं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत भुजबळ यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. दरम्यान भुजबळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीचं सरकार काय भूमिका घेणार? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

काय म्हणाले भुजबळ?

हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला आहे. त्या महापुरूषांची शिकवण लहान शाळकरी मुलांना दिली पाहिजे. जे कां रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणारे तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे”!, असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे. असं भुजबळ म्हणाले आहेत.

हे शांत होतंय न होतंय तोवर मनुस्मृतीची चर्चा

लोकसभा निवडणुकीला 400 पारचा नारा दिला गेला. यामुळे संविधान बदललं जाईल अशा पद्धतीचा प्रचार केला. यामुळे दलित वर्ग नाराज झाल्याचं बोललं जात आहे. हे शांत होतंय न होतंय तोवर आता मनुस्मृतीची चर्चा होऊ लागली. याचा आगामी काळात फटका बसू शकतो याचा देखील विचार आपण करायला हवा, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपने 80-90 जागा देण्याचा शब्द दिला त्याची आठवण करून द्या, अशी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मागणी केली.

महायुतीत आल्यानंतर भाजपने महायुतीत विधानसभेत योग्य वाटा मिळावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. यापार्श्वभूमीवर येत्या विधानसभेत राष्ट्रावादीच्या जागावाटपाबाबत माहिती समोर येईल. राष्ट्रवादीला येणाऱ्या विधानसभेत किती जागा दिल्या जातील ही येणारी वेळच सांगेल.

News Title – Chhagan Bhujbal Against About Manusmriti Syllabus Include In Education

महत्त्वाच्या बातम्या

“मराठीत बोलली म्हणून थेट धमकी..”; अभिनेत्रीने सांगितला लोकलमधील धक्कादायक अनुभव

“पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही”; धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं

पुणे पोलिसांकडून महिन्याला किती रुपयांची वसुली?, रवींद्र धंगेकरांनी थेट यादीच दिली

“..म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”; अजितदादांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .