मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal | आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त पुण्याजवळील चाकण येथील महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनूसार, पुण्यातील चाकण येथे आज (3 जानेवारी) रोजी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत. मात्र, यावेळेस राज्य मंत्रीमंडळ विस्तारामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीसा यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही, तर अनेकवेळा माध्यमांशी बोलत असताना त्यांनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली होती.

पुन्हा एकत्र?

शिवाय, गेल्या काही दिवसांपासून भुजबळ भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकमेकांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्या दोघांनी पुन्हा एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात काहीतरी मोठं घडतंय असं बोललं जात आहे. मात्र त्यानंतर छगन भुजबळ हे भाजप पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र त्या दरम्यान ते परदेशात गेले होते. तिथून परत आल्यावर आता शरद पवारांसोबत ते एकाच मंचावर असणार आहेत. परंतु, आता यावेळी ते काय भावना व्यक्त करतात, तसेच काय मत मांडतात व कोणावर निशाणा साधतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

News Title : chhagan bhujbal and devendra fadnavis together in one car

महत्त्वाच्या बातम्या-

कोणत्या कारच्या कंपनीला भारतात सर्वाधिक मागणी?, महत्त्वाची आकडेवारी उघड

देशमुख प्रकरण भोवलं! धनंजय मुंडेंचा पत्ता कट?

नोंदणी विवाहासाठीची प्रक्रिया काय असते?, अर्ज ते कागदपत्रे सर्व माहिती जाणून घ्या

वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, घरात ही गोष्ट असेल तर मिळणार नाही लाभ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .