भुजबळांना दणका, आणखी 20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचलनालयाने भुजबळांची आणखी 20 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. 

सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेल्या मालमत्तामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिकमधील बंगले, फ्लॅट्स, कार्यालये अशा एकूण 5 मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे भुजबळांच्या आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत 178 कोटी रुपये झालीय. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना येथील बांधकामात गैरव्यवहार केल्याचा भुजबळांवर ठपका आहे. याप्रकरणात भुजबळांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर हे देखील आरोपी आहेत.