छगन भुजबळांची ३०० कोटींची संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई

मुंबई | बेहिशेबी संपत्ती प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची ३०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. आयकर विभागाने ही कारवाई केलीय. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय.

संपत्ती जप्त केल्यासोबतच छगन भुजबळांबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. ४८ बनावट कंपन्या बनवून त्यांनी ही बेहिशेबी संपत्ती जमवल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. 

दरम्यान, जप्त संपत्तींमध्ये नाशिक आणि मोक्याच्या जागांवरील संपत्तींचा समावेश आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या