बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा’; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्चला एक महत्वाचा निर्णय दिला होता. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्यानं दाखल केली होती. मात्र, ही याचिका देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केली होती. त्यामुळं महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासोबतच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील समोर येत आहे.

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते आता या प्रश्नावर अधिक आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारच्या विरोधात गुरुवारी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप ओबीसी मोर्चाने केली आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. येत्या महिनाभरात राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली आहे.

दरम्यान, न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करतानाच मागासवर्गीय आयोग स्थापन केला नाही तर आघाडी सरकारच्या मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

‘तुझ्या बापाला’ म्हणत किशोरी पेडणेकरांचं नेटकऱ्याला रोखठोक उत्तर!

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More