Chhagan Bhujbal | विधानसभा निवडणुकीसाठी आता आठवडाभराचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे राज्यभरात प्रचारसभा गाजत आहेत. या प्रचारसभेतून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून 2004 सालचा एक किस्सा उघड केला. 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. (Chhagan Bhujbal )
2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असा खुलासा शरद पवार यांनी केला. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल मी अनेक वेळा आभार मानले आहेत. आता शरद पवार का बोलले? मला कळत नाही. शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांनी केलंय. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले”, असा खळबळजनक आरोप भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी केलाय.
“2004 साली मला मुख्यमंत्री नाही केलं. बरं मग आर आर पाटील, अजित दादा यांना का नाही केलं? सुधाकरराव नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केलं, जेव्हा ते दिल्लीला गेले होते, नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते. नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते. नरसिंह राव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठविले. मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी भुजबळ, ना आर आर पाटील, ना अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं”, असं भुजबळ म्हणाले आहेत.
“मला दोष नसताना तेलगी प्रकरणात अडकवलं गेलं”
पुढे त्यांनी तेलगी प्रकरणावरूनही टोलेबाजी केली. “ते कधीपासून भविष्य पाहायला लागले?मला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणात उगाच गोवलं गेलं. ऑफिसरमधील वाद होते, मला राजीनामा द्यायला लावला. मला माहिती नव्हते, लोक चिडले म्हणून सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतले. मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं.”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी केला.
News Title : chhagan bhujbal big claim about sharad pawar
महत्वाच्या बातम्या –
प्रेमात यश ते व्यवसायात भरभराटी, आज कुणाचं भाग्य उजळणार?; वाचा राशीभविष्य
‘आमदार नाही तर मंत्री म्हणून…’; संभाजी पाटील निलंगेकरांबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य
गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!
शरद पवारांचा सदाभाऊ खोतांना मोठा धक्का!