Chhagan Bhujbal | महायुतीच्या मंत्रीमंडळात डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चर्चेत आले आहेत. मंत्रीमंडळात डाववल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलूनही दाखवली आहे. ते सतातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधताय. काल, 22 डिसेंबररोजी मुंबईत ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला. यानंतर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांचे कौतुक देखील केले. अजित पवार यांनी मागे नवीन लोकांना संधी द्यायला हवी, असं विधान केलं होतं. त्यावरूनच भुजबळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. “ही चांगली गोष्ट आहे. पण, हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथं थांबावं लागलं, राज्यसभेतही थांबावं लागलं. मला तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा..म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा का?”, असा संतापजनक सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
भुजबळांकडून शरद पवारांचे कौतुक
पुढे त्यांनी वयाच्या आकड्यावरूनही अजित पवारांना डिवचले. ‘मंत्री म्हणून तुम्ही पण तर जुने आहात.तुमचे काय वय आहे?’, असा सवाल भुजबळ यांनी केला. तसेच पुढे त्यांनी ‘आमच्यापेक्षा त्यांचे (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे) खासदार निवडून आले. परभणी आणि बीडमध्ये तुमच्या आधी तर शरद पवार तिथं पोहोचले’, असं म्हणत शरद पवार यांच्यावर देखील कौतुकाचा वर्षाव केला.
दरम्यान, अजित पवार यांनी देखील छगन भुजबळ यांच्या नाराजीवर सूचक विधान केलंय. बारामतीमधील मेळाव्यात ते बोलत होते. नाव न घेता अजित पवारांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीवर भाष्य केलं. “मंत्रीमंडळ विस्तारावेळी आपण काही नावे मंत्रीपदासाठी दिली होती. त्यामध्ये काही मान्यवरांना आपण थोडं थांबायला सांगितलं, पण काहींनी लगेच नाराजी, रोष व्यक्त केला”, असं अजित पवार म्हणाले.
तसंच पुढे बोलताना, “नवीन लोकांनाही मंत्रीमंडळात संधी द्यावी लागते. तसेच कधी-कधी आपण जुन्या नेत्यांना या ठिकाणी संधी न देता केंद्रात कशी त्यांना संधी मिळेल, याबबात विचार केला जातो. त्यामुळे मानसन्मान देण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले होते.
News Title : Chhagan Bhujbal Big Statement
महत्वाच्या बातम्या –
पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर
मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून करा ‘हे’ उपाय
‘मी मंत्री आहे तर पालकमंत्री पण मीच…’; महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद
धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार?, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?