अजित दादांना कसलीही कल्पना न देता भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

Chhagan Bhujbal | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण प्रचंड तापलं आहे. अशात राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत थेट शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आरक्षण प्रश्नी चर्चेसाठी तयार केलं आहे. काल बारामतीमधील सभेत भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत त्यांच्यावर आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा आरोप केला होता.

या आरोपांनी राज्यात एकच खळबळ उडाली होती. तर, आज 15 जुलैरोजी त्यांनी सकाळीच सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीबद्दल फक्त अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाच सगळी माहिती होती.

छगन भुजबळ यांनी शरद पवारांना चर्चेसाठी केलं राजी

यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे आरक्षण मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. या बैठकीबाबतही त्यांनी शरद पवारांकडे उल्लेख केला.

“महाराष्ट्रात ओबीसी यांना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाचे हॉटेल असले तर, तिथे जात नाही. तर, ओबीसीचे जिथे दुकान असतील त्या ठिकाणी मराठे जात नाहीत. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, राज्यातील ही परिस्थिती आता शांत करायची तुमची जबाबदारी आहे.” असं भुजबळ (Chhagan Bhujbal ) शरद पवार यांना म्हणाले.

भुजबळ आणि पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

यावर शरद पवार यांनी “एक-दोन दिवसांत मीच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतो आणि काय होतंय आणि काय करता येईल, यावर मी चर्चा करायला तयार आहे.आमचे काही नेते यावर चर्चा करू.”, असं म्हटलं.

यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवारांना, ‘तुम्ही बोलावलं, तुम्ही सांगितलं तर सगळे येतील, असं म्हटलं. दरम्यान, आता शरद पवार पुढे काय भूमिका घेतात आणि या एक दोन नेत्यांमध्ये नेमकं कोण असणार?, याबाबत सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुती सरकारमधील मंत्री असणारे भुजबळ यांनी स्वतः पुढाकार घेत विरोधी गटाच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन हा मुद्दा मांडल्यानंतर राजकारणात याची जोरदार चर्चा आहे.

News Title-  Chhagan Bhujbal discussed with Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या-

“मला राजकारणाची किंवा मंत्रीपदाची परवा नाही, फक्त..”; शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

संभाजी राजेंवर गुन्हा दाखल होणार?, मोठी माहिती आली समोर

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंना भेटणार!

‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत