मुंबई | राज ठाकरे यांच्या मागे हजारो मतं आहेत, त्यामुळे ते आघाडीत आले तर फायदाच होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
सध्या राजकीय वर्तूळात मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येणार याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. यातच भुजबळ यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याचं समर्थन दर्शवलं आहे.
आगामी निवडणूक आघाडीसाठी महत्वाची असून प्रत्येक मत आवश्यक आहे, त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जागावाटपाबाबत काही चर्चा सुरु आहे का?, या विचारलेल्या प्रश्नावर याबाबत मला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
-जर काँग्रेसनं सन्मानानं उमेदवारी दिली तर पुण्यातून लोकसभा लढणार- संजय काकडे
–राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी तयार; विद्यमान खासदारांना मिळणार संधी?
–5 मिनिटांच्या भेटीत राफेलवर एकदाही चर्चा झाली नाही; मनोहर पर्रिकरांनी लिहलं पत्र
–धक्कादायक! महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी झाडल्या गोळ्या
–पटक देंगे म्हणणाऱ्या अमित शहांचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंना केला फोन