बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

नाशिक | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील राजकीय वाद विकोपाला पोहोचला आहे. छगन भुजबळांनी निधी विकल्याचे 500 पुरावे आपल्याकडे असल्याचं सुहास कांदे यांनी सांगितलं. तसेच छगन भुजबळ यांना पालकमंत्रिपदावरून हटवण्याची देखील मागणी केली आहे. सुहास कांदे यांनी केलेले सगळे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे.

राज्य सरकारने या वर्षीचा निधी कोरोनासाठी वापरण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे नांदगावला 45 कोटी निधी दिला. निधी वाटप हा जिल्ह्याधिकारी समितीने घेतला आहे. मी निधी वाटतो हा सुहास कांदे यांचा आरोप चूकीचा आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं.

पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणं योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटलं तर ते पालकमंत्रीसुद्धा बदलतील, असं भुजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान, मी सुहास कांदे यांना सहकार्य करणार. मी कोणालाही धमकी देत नाही. मात्र विनंती जरूर करतो. हा भुजबळ विरूद्ध शिवसेना संघर्ष नाही. सुहास कांदे शिवसेनेचे म्हणून शिवसेना नेते त्यांच्यासोबत असावेत. निवडणुक आली की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार आणि शेवटी जनता ठरवेल कोण योग्य, असंही भुजबळ म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

“महाराष्ट्राची जनता अनाथ झाली की काय, त्यांचं कोणीच वाली नाही का?”

‘मीच तो सर्वज्ञ’ फडणवीसांच्या अशा स्वभावामुळे राज्यावर संकट आलं- रूपाली चाकणकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More