बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश छगन भुजबळ यांनी दिले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच 5 रुपयांत शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

सर्वांनी नियमांचं पालन केलं तरच आपण करोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”

“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More