Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर गेले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या चर्चेवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. यावेळी बोलत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आम्ही मंत्री मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्या पेक्षा आमचा अभ्यास जास्त झाला नसल्याचं वक्तव्य केलं.
“आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊनही आला नाहीत?”
त्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेतली होती. त्याबैठकीला शरद पवार आले नव्हते. त्यावर देखील भुजबळांनी शरद पवारांसोबत चर्चा केली. आपण राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक घेऊनही का आला नाहीत? त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं असून शरद पवार म्हणाले, मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली हे माहिती नाही. लक्ष्मण हाके आंदोलन करत असताना तुमच्यात काय झालं मला माहिती नाही म्हणून आरक्षणाच्या सभेला आलो नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेवर भाष्य केलं. माझे म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर शरद पवार यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकदा चर्चा करेल. मी आरक्षणाची समस्या सोडवायला तयार असल्याचं शरद पवार म्हणाले. सध्या माझी तब्येत बरी नाही, पण दोन दिवसात आपण यावर चर्चा करू, असा शब्द शरद पवारांनी दिला असल्याचं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
“ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांततेची तुमची जबाबदारी”
या भेटी दरम्यान, छगन भुजबळ यांनी आरक्षणाबबत लक्ष घालण्याचं शरद पवारांना आवाहन केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी, धनगर, वंजारी हे मराठा समाजाच्या दुकानात जात नाहीत. मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. अशा परिस्थितीत एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, असं मी शरद पवारांना सांगितलं असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याप्रकरणी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, असं छगन भुजबळ म्हणाले. यात सरकारचं काय व्हायचंय ते होईल, मात्र हा निर्णय होणं गरजेचं असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.
याचपार्श्वभूमीर आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात पुन्हा ओबीसी आणि मराठा आरक्षणावर चर्चा कधी होईल? या चर्चेतून काय निष्पन्न होईल हे पाहणं गरजेचं आहे.
News Title – Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar At Silver Oak
महत्त्वाच्या बातम्या
छगन भुजबळ मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांनंतर राहुल गांधींनाही भेटणार?
पुणेकरांची चिंता वाढली! झिका व्हायरसनंतर आता ‘या’ रोगाचा शिरकाव
अजित दादांना कसलीही कल्पना न देता भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी