मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

Chhagan Bhujbal | आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भुजबळ यांनी गंभीर आरोप केले होते.

काल आरोप केल्यानंतर आज (15 जुलै) छगन भुजबळ थेट सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का गेले असतील?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत आहत.

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

त्यांच्या भेटीमागील कारण अद्याप समोर आलं नाहीये. मात्र, काल भर सभेत आरोप केल्यानंतर आज सोमवारी सकाळीच शरद पवारांच्या भेटीसाठी भुजबळ (Chhagan Bhujbal) सिल्व्हर ओकवर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आपल्या या भाषणानंतर आज भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता.

या बैठकीबाबतच भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा खुलासा केला. “तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय?हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.”,असा खुलासा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल केला.

News Title- Chhagan Bhujbal meets Sharad Pawar  

महत्वाच्या बातम्या-

मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं वक्तव्य; थेट म्हणाले…

रोज सकाळी फक्त एक ग्लास Beetroot Juice पिण्याचे आहेत ‘इतके’ फायदे!

आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..

“तुम्ही फक्त अर्ज करा, तो मंजूर करणं..”; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

छगन भुजबळांचा शरद पवारांवर अत्यंत गंभीर आरोप; महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ