“काय समज द्या, समज द्या लावलंय”; भुजबळांनी भाजप नेत्यांना सुनावलं

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ते भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत 80-90 जागेबाबत मागणी करताना दिसत आहेत. याआधी महायुतीत सामिल होत असताना आम्हाला तसा भाजपने शब्द दिला, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला होता. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्यावरून अनेक नेते आता दुखावले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

“काय समज द्या, समज द्या लावलंय”

अशातच आता भाजप नेत्यांनी भुजबळ यांना समज द्या, असं वक्तव्य केलं आहे. आता भाजपलाच छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षातच बोलणार, असं म्हणत भुजबळ यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेविषयी भुजबळांना विचारणा करण्यात आली. त्यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं की, मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. पण त्याचंही लोकांना वाईट वाटतं, असं कसं भुजबळ बोलू शकतात, अशी ओरड त्यांनी केली.

मी आता काही प्रसारमाध्यमांशी काहीही बोलणार नाही. मला जे काही सांगायचं आहे ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना काय बोलले होतो. त्याची आठवण फक्त मी त्यांना करून दिली. पण त्यावरून तुम्ही चर्चा करता, चॅनेलमध्य बोलता, समज द्या, असं बोलले जाते, असंही त्यांनी म्हटलं.

तुम्ही पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठं काय बोलतो? तुमच्या पक्षात काय बोलता हा तुमचा अधिकार आहे. तसच मी काय बोलेल हा माझा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

एक्झिट पोलवर केलं भाष्य

यावेळी छगन भुजबळ यांनी एक्झिट पोलवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचा पराभव होईल तर महायुतीचा विजय होईल. महायुतीच्या 45 जागा विजयी होतील. दोन ते तीन चुकूनमाकून जागा महाविकास आघाडीला जातील, असं भुजबळ म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal On BJP About Vidhan Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा

‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

पुणे अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर, त्या रात्री विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरेंना…

शाहरुख खान ‘या’ गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही; गौतम गंभीर असं का म्हणाला?

महायुतीत वादाची ठिणगी?, भुजबळ पुन्हा कडाडले