बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आज सगळ्यावर जीएसटी आहे, फक्त भाषणावर जीएसटी नाही”

मुंबई | पावसाळी अधिवेशन सुरू असताना जीएसटीवरून मुद्दे मांडताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी काळ्या-पांढऱ्या दाढीवरून थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांना टोले लगावले आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच संतापलेले दिसले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी जीएसटीवरून मुद्दे मांडताना सरकारवर हल्लाबोल केला. यावरून त्यांनी पांढऱ्या दाढीवरून टोलेबाजी केली आहे. आणि तिथे एकच हशा पिकला. तसेच सर्व गोष्टींवर आज जीएसटी आहे फक्त भाषणावर जीएसटी नाही, असा टोला देखील त्यांनी लगावलाय.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. पण यामागचं कारण हे वेगळं वेगळं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. पण यामध्येसुद्धा सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव हा महाराष्ट्रातच आहे. पांढऱ्या दाढीचा परिणाम संपुर्ण हिंदुस्तानावर आहे, असा टोला जीएसटीवरून छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांचं सभागृहात मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराब पाटलांना सभागृहात झापलं, म्हणाल्या ‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी’

Monsoon Assembly 2022 | ‘नितेश राणेंना काहीतरी शिकवा’, प्रश्नोत्तराच्या तासावेळी जाधव राणेंमध्ये जोरदार खडाजंगी

Monsoon Assembly 2022 | अजित पवारांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत गडबडले, वाचा नेमकं काय घडलं?

ATM News: पैसे काढणाऱ्यांना झटका, इतके रूपये मोजावे लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More