सुनेत्रा पवारांना खासदारकी देणं ही घराणेशाही नाही का?, छगन भुजबळ थेट म्हणाले…

Chhagan Bhujbal | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. यामध्ये सुनेत्रा पवारांचा पराजय झाला तरीही बारामतीत पराजय झालेल्या उमेदवारालाही खासदार होता येतं हे सिद्ध झालं आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं. तेव्हा सुनेत्रा पवारांना खासदारकीची संधी दिली.

याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज होते. त्यावर माध्यमांसमोर बोलताना ते नाराज नसल्याचं सांगत आहेत. परंतु सर्वच गोष्टी मनासारखी होत नाही. काही वेळा तडजोड कराव्या लागतात, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांसोबत बोलत असताना केली आहे. सुनेत्रा पवारांना तिकीट देणं म्हणजे घराणेशाही नाही का?, एका प्रश्नवर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी तयार झालो होतो. मला दिल्लीतून निवडणूक लढवण्यासाठी निरोप आला होता. त्यानंतर मी तयारीला सुरूवात केली होती. परंतु एक महिना झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली गेली नाही. त्यामुळे त्यावेळी मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे स्पर्धक उमेदवार एक महिन्याहून कमाला लागले. नाशिकमध्ये एका महायुतीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या एका दिवशी जाहीर झाला, त्या सर्वांचे परिणाम जय पराजय झाला, असं स्पष्टपणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलं.

घराणेशाही नाही का?

राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही? यामुळे तुम्ही नाराज नाही का? त्यावर बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की, मला राजकारणात 57 वर्षे झाले आहेत. अनेकवेळा आपणास वाटते की असे झाले पाहिजे. परंतु नेहमी मनासारखे होत नाही. तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. त्यानंतर छगन भुजबळ यांनी दोन्ही वेळेस तुमच्यावर अन्याय झाला का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “त्याचं उत्तर त्यांनाच विचारा”.

लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा धोका ठरला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत की, या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला आहे. यामुळे संविधान बदलणार असल्याची चर्चा झाली होती, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत कमी मतं मिळाल्याने संघांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संघाचे नाराजी होणे हे स्वाभाविक आहे. त्याचं विश्लेषण हे संघाकडून करण्यात आले होते, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal On Pawar Family Nepotism In Politics

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार ‘या’ घोटाळ्यामुळे पुन्हा अडचणीत सापडणार?

शेतकऱ्यांनो यापुढे कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरविणार, शेतकऱ्यांचा फायदा की तोटा?

राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने वर्तवला महत्वाचा अंदाज!

ज्योती मेटेंची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा!

पुढील दोन दिवसात या राशीचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा