बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

मुंबई | क्रुझ कारवाई आणि आर्यन खानच्या अटकेपासून सुरू झालेल्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या कारवाईचं नेतृत्व करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांनी वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडताना अनेक खुलासे केले. त्यातलाच एक खुलासा म्हणजे वानखेडे हिंदू नसून मुस्लिम आहेत.

समीर वानखेडेंच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद असल्याचा खळबळजनक दावाही मलिकांनी केला होता. मलिकांच्या या आरोपानंतर ज्ञानदेव वानखेडे माध्यमांसमोर आले आणि म्हटले की, माझं नाव ज्ञानदेवच आहे पण बायको मला लाडाने दाऊद म्हणते. वानखेडेंच्या या खुलास्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे.

आमच्याकडे अहो जा हो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात पण मी पहिल्यांदाच ऐकलं की ला़डाने दाऊदही म्हणतात, अशी विशेष टीप्पणी छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर समीर वानखेडेंची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रावरूनही भुजबळांनी टोला लगावला आहे. एक मराठी माणुस म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत असल्याचं क्रांतीने पत्रात लिहिलं होतं.

यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, मीही मराठी माणुसच होतो ना, मग अडीच वर्ष तुरूंगात कशाला ठेवलं?, तेव्हा कुठे गेला होता मराठी माणुस?, असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. सत्याला राष्ट्रवादीची साथ आहे. नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणत असल्याचंही छगन भुजबळ यांनी बोलुन दाखवलं आहे. सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच, असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पोपट पिंजऱ्यात गेला तर अनेक गुपितं उघड होतील अन्…”

फेसबुकने नाव बदललं अन् ट्विटरने उडवली खिल्ली, म्हणाले…

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More