बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेव्हा छगन भुजबळ फडणवीसांना फोन करून म्हणतात, ‘आम्हाला मदत करा,आम्ही…’

नाशिक | उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील देण्यात येणारे अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर देखील राज्य सरकारची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयानं निर्णय अखेर कायम ठेवला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजात असंतोषाचं वातावरण आहे. आता या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक येथे महात्मा फुले समता परिषदेची एक बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने घालून दिलेल्या नियमांची खिल्ली उडवत 100 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील देण्यात येणाऱ्या अतिरिक्त ओबीसी आरक्षणाविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा केला आहे. त्यात त्यांनी ओबीसी आरक्षणावर मदत मागितल्याचं देखील सांगितलं आहे.

‘मी देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला. ओबीसी आरक्षणासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. आम्हाला दोष द्या पण ओबीसी समाज सध्या अडचणीत आहे. त्यांच्यासाठी केंद्रस्तरावर मदत करा’, अशी मागणी केल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक उत्तर दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारशी फडणवीस बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली होती.

थोडक्यात बातम्या-

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More