बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा जन्माचा दाखला नाही”

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी (एनआरसी) या मुद्द्यांवरुन देशात संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मी सुद्धा जन्माचा दाखला देऊ शकत नाही, असं वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

आसामचं आपण उदाहरण घेतलं तर मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदूना नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही. मला जर विचारलं की, तुमच्या आई-वडिलांचा जन्मदाखला दाखवा तर ते मी देऊ शकणार नाही. तसेच माझ्याकडे सुद्धा खरा जन्मदाखला नाही, असं भुजबळ म्हणाले आहेत.

आदिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोक भटकंती करत असतात. त्यामुळे त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नसते. अशा लोकांकडे कागदपत्रं कोठून येणार? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएला पाठिंबा दिला असेल, पण त्यांनी एनआरसीचं समर्थन केलेलं नाही. तसेच आमच्या पक्षाच्या या दोन्हींना विरोध आहे, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; बच्चू कडूंचा घरचा आहेर

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!

महत्वाच्या बातम्या-

“मुस्लिमांना आरक्षण देणे ही तर उद्धव ठाकरेंची लाचारी”

इंदोरीकरांच्या वक्तव्याचं किती भांडवल करणार- सिंधुताई सपकाळ

अमोल कोल्हेंनी ‘तो’ प्रण फेटा बांधून पूर्ण केला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More