मी लहान खेळणं वाटतो का? भुजबळांनी मनातली सगळीचं खदखद बाहेर काढली

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal l महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. अशातच राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे.त्यानंतर त्यांनी उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी मनातली सगळीच खदखद बाहेर काढली आहे.

पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? :

मला यंदाच्या वेळी मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्नच माझा नाही. मात्र ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी प्रचंड नाराज आहे. तसेच पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, आणि ते सांगतील तेव्हा उठायचं, तसेच ते म्हणाले की निवडणूक लढवायची? असा परखड सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रुफल पटेल यांना देखील अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले आहेत. तसेच छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून ज्या प्रकारे वागणूक दिली आहे त्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे देखील मला सांगण्यात आले. मात्र त्यावेळी मी त्यासाठी पूर्ण तयारी देखील केली होती, तसेच तेव्हा चांगले वातावरण देखील तयार झाले होते.

Chhagan Bhujbal l भुजबळांनी अजित पवारांवर केले आरोप :

मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव लोकसभेसाठी घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती. तसेच त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची देखील इच्छा व्यक्त केली. मात्र तेव्हा देखील सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे असे मला सांगण्यात आले. परंतु तेव्हा देखील मी शांत बसलो. तसेच मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा नक्कीच पक्षाला होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं फार गरजेचे आहे.

दरम्यान आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. तसेच त्यासाठी आता नितीन पाटील यांना देखील राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मात्र मला संधी देण्यात आली नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली उद्विग्नता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

परंतु आता मी निवडणूक लढलो आहे. तसेच आता कुठे विधानसभेची निवडणूक संपली आहे. त्यामुळे मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न आता सोडवायचे आहेत. तसेच निवडणुकीत माझ्यासाठी ज्या लोकांनी काम केलं आहे त्यांना मी त्यांना काय सांगू? त्यामुळे मी आता लगेचच राजीनामा देऊ शकत नाही. कारण राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा नक्कीच द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे टंबणार आहे, तसेच मी माझ्या मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो असे देखील सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर आपण नंतर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसलेच नाहीत अशा थेट आरोप आमदार छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.

News Title : chhagan bhujbal said to rejected praful patel offer of rajyasabha seat

महत्वाच्या बातम्या –

सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

“माझं मंत्रिपद कोणी नाकारलं”, छगन भुजबळ कडाडले

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

‘…तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

‘पुष्पा 2’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार? जाणून घ्या कधी व कुठे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .