Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अजित पवार यांची साथ निवडली. आता इतक्या महिन्यांनी त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्यामागील कारण सांगितलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाखाली या पुस्तकात अत्यंत गंभीर दावे करण्यात आले आहेत. यात छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, अनिल देशमुख यांसह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
काही मीडिया रिपोर्टमध्ये या पुस्तकात केलेले दावे उघड करण्यात आले आहेत. याच मीडिया रिपोर्टनुसार भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले होते की, “मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. मी जर उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या 75 व्या वर्षात किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधीच 100 कोटींच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असे अनिल देशमुखांना सांगण्यात आले होते. मलाही अशाप्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु होता.”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) मुलाखतीत म्हणाले असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
“मी, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय आपली सुटका नाही, असं सगळ्यांनाच वाटत होतं. पुढे आम्ही हा विषय शरद पवार यांच्याकडे मांडला. शरद पवारांना हे सर्व काही समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास तयार नव्हते. नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ईडीच्या जाचापासून सर्वांचीच सुटका झाली”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
News Title : Chhagan Bhujbal sensational revelation
महत्वाच्या बातम्या –
मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन
सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर
“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत
रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!