बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पाण्याविना मासा तडफडतो तसा भाजप सत्तेविना तडफडत आहे”

नाशिक | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. जरंडेश्वर प्रकरणात अजित पवारांचा हात असल्याचा आरोप सातत्याने भाजप नेत्यांकडून केला जात आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ईडी म्हटलं की लोक घाबरत असतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं. ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल. कोणावर तरी आरोप, कोणाला तरी नोटिसा असं नेहमीच सुरु असतंय. सध्या सत्ता मिळवण्याकरिता ईडीचा दुरूपयोग चालू आहे. पाण्याविना मासा तडफडतो तसा भाजप सत्तेविना तडफडत आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

तसेच छगन भुजबळ यांना यावेळी नाशिक शहराच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नाशिक शहराचा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मी एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तेवढं काम झालेलं नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री केली असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी यापुर्वीच मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे म्हणाले…

महाराष्ट्रात ईडीच्या मार्फत सत्तांतर करण्याचा डाव???; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More